विद्यार्थी शाळा, शिक्षक, पालक....
![]() |
विद्यार्थी शाळा, शिक्षक, पालक.... |
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक
शिक्षक हा विद्यार्थ्या सोबतच समाजाचाही शिल्पकार आहे. त्याच्या हातूनच भावी समाजाची व व पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचे कार्य घडत असते, त्यासाठी शिक्षक हा सतत अभ्यासू असला पाहिजे ,ज्ञानी असला पाहिजे, गुणी असला पाहिजे, आणि तो चिंतनशील, समाजशील, परिवर्तनशील व कृतिशील असला पाहिजे. त्याच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता असली पाहिजे. अन्यथा कुचकामी राष्ट्रद्रोही पिढी तयार होईल.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
यासाठी अभ्यासक्रम आहे तितकाच दर्जेदार असला पाहिजे सध्याचा अभ्यासक्रम हा फक्त मुलांना साक्षर करणार आहे .त्यातून समाज व राष्ट्र हित घडेल की नाही याची जरा शंकाच निर्माण होते. तेव्हा शिक्षकावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, ती म्हणजे नव्या परिवर्तनशील युगाचा नव्या समाजव्यवस्थेचा नव्या अर्थव्यवस्थेचा नव्या जाणीवेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्याची.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक....
युगनायक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात, "विद्यार्थी हा परीक्षार्थी आणि शिक्षक हा पोटार्थी झालेला आहे, जोपर्यंत विद्यार्थी हा ज्ञानार्थी आणि शिक्षक हा समाज आर्थी होणार नाही तोपर्यंत समाजाचे कल्याण होणार नाही"
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक....
बालकावर शिक्षकाला योग्य असे संस्कार करणं सोपं असतं ,कारण त्याचा शिक्षकावर प्रचंड विश्वास असतो. बालसंस्कार हे चिरकाल टिकणारे असतात, म्हणून डॉ. आ. ह.साळुंखे म्हणतात ,"पिकलेली पाने कधीं न कधी गळून पडणारी असतात परंतु कोवळ्या कळ्या ह्या जपल याच पाहिजे, त्या कोमेजतात कामा नये"
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
यानुसार वयस्क माणसाच्या धारणा ह्या पक्क्या झालेल्या असतात. त्यांना बदल अशक्य असते, परंतु बाल मनावर सुसंस्कार करणे तितकेच सोपे असते .हे काम शिक्षकालाच करावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षक हा वैज्ञानिक सामाजिक शैक्षणिक जाणीव असलेला असणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच त्याला बालमानसशास्त्र व समाजशास्त्र पारंगत असले पाहिजे.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
शिक्षण हे सर्व क्रांतीचे मूळ असेल, तर शिक्षण देणारा शिक्षक या क्रांतीचा क्रांतिकारक आहे. शिक्षकाने जर ही क्रांती केली नाही तर अपेक्षित परिवर्तन घडणार नाही, त्यासाठी शिक्षका बरोबरच बालकाच्या मातापित्यांनी ही या क्रांतीत तितक्याच जोमाने सहभागी झाले पाहिजे, म्हणूनच संत गाडगेबाबा असे म्हणतात,
पण लेकराला शिक्षण शिकवा"
बदलत्या परिस्थितीनुसार मुलांना दर्जेदार शिक्षण देणे शिक्षक व पालकांना कठीण झाले असले ,तरी अशक्य मात्र नाही कारण ,"शिक्षक कभी सामान्य नही होता सृजनता उसकी गोद मे पलती है" हा सुविचार तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक....
शिक्षणाचे पाच टप्पे आहेत अशिक्षित, सुशिक्षित ,सुसंस्कृत ,सृजनशील, सध्या आम्ही केवळ दुसर्या टप्प्यावर आहोत. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांना, बहुजन समाजाने सृजनशीलतेचा टप्पा गाठावा असे अभिप्रेत होते. म्हणूनच त्यांनी शिक्षण हा शब्द वापरण्याऐवजी विद्या हा शब्द वापरला.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक.....
विदयेमुळे मती, नीती ,गती आणि वित्त येते हे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगीतले.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्या दिशेने कृतिशील पावले उचलली परंतु,बहुजनांच्या मुला मुलींची शिक्षणाची समस्या ही दुहेरी असल्यामुळे आजही तिची तीव्रता कमी झालेली नाही. बहुजनांच्या बुद्धीवर आजही अंधश्रद्धेची जाळे जळमटे चढलेली आहेत आणि त्याला हजारो वर्षाचे अज्ञानच कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांच्यात ज्ञानाची भूक निर्माण करणे ही पहिली समस्या आणि नंतर ती भागवणे ही दुसरी समस्या आजच्या शिक्षकांपुढे व शिक्षणा पुढे आहे.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
शिक्षणाचे शस्त्र आणि शास्त्र हे न्याय, स्वातंत्र्य ,समता, बंधुत्व या मुद्द्यावर आधारित लोककल्याणकारी समाज निर्माण करणारी भावी पिढी घडवू शकते, आणि हे कार्य माझे शिक्षक बांधवच करू शकतात याचा मला सार्थ विश्वास आहे.
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
त्यासाठी शिक्षकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, सध्या शिक्षकांना पाठ विषयक, अभ्यासक्रम विषयक, मूल्यमापन ,उपक्रमशीलता याच विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. पण या बरोबरच अत्याधुनिक शैक्षणिक साधने, डिजिटल तंत्रज्ञान व महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांची सकारात्मक मानसिकता वृद्धिंगत होण्यासाठी जे प्रशिक्षण आवश्यक आहे असे अधिक प्रभावी व परिणामकारक पद्धतीचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न शासनाने करावा. व या विषयाची एक चळवळ हाती घ्यावी. त्याची मोठ्या प्रमाणात सध्या गरज आहे कारण शिक्षण प्रक्रियेत प्रत्येक गोष्टीचा आत्मा शिक्षक हाच आहे. त्यामुळे शिक्षकांना अधिक कार्यरत केले तर सर्वच सर्व समस्या मिटतील व कमी होतील .
विद्यार्थी शाळा, शिक्षक पालक ....
अविरत व अखंड चालणार्या कार्यासाठी फक्त एकच सांगावेसे वाटते................
IF YOU THINK,YOU CAN,
YOU CAN,
IF YOU THINK YOU CAN NOT,
YOU CAN NOT.
जर तुम्हाला वाटलं ते आपण करू शकतो तर निश्चितच तुम्ही ते करू शकता, जर तुम्हाला वाटलं आपण हे करू शकत नाही तर तुम्ही ते कधीही करू शकत नाही.
म्हणून..................
0 टिप्पण्या